You are currently viewing वैभववाडी निवासी नायब तहसिलदार पदी ए. आर. कवळेकर यांची निवड

वैभववाडी निवासी नायब तहसिलदार पदी ए. आर. कवळेकर यांची निवड

वैभववाडी :

 

वैभववाडी तालुक्यातील तहसिलदार पदी निवासी नायब ए. आर. कवळेकर यांची नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. यापूर्वी कवळेकर यांनी तालुक्यात तलाठी म्हणून काम केले आहे. त्यांचे आणि वैभववाडीचे नाते अतुट आहे. तत्कालीन नि. नायब तहसीलदार ए. के. नाईक यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर अनेक महिने पद रिक्त होते.

श्री. कवळेकर यांनी आपल्या नोकरीची सुरूवात तलाठी म्हणून 1994 मध्ये देवगड तालुक्यात केली. त्यानंतर त्यांनी तलाठी सजा करूळ ता. वैभववाडी या तलाठी पदावर सलग बारा वर्षे सेवा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी कुसुर, आखवणे व कणकवली तालुक्यात या पदावर काम केले.

देवगड तालुक्यात मंडळ अधिकारी पदावर असताना त्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतीच त्यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार (गट ब) संवर्गातून नायब तहसीलदार वैभववाडी पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्ती नंतर त्याचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + fifteen =