नेमळे विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल.!
रिया जाधव ९३.२० टक्के मिळवत विद्यालयातून प्रथम.
सावंतवाडी :
तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातून प्रथम क्रमांक रिया राघोबा जाधव (९३.२० टक्के), द्वितीय क्रमांक विश्वजीत सदानंद पेंडसे (९१.६० टक्के ) व तृतीय क्रमांक श्रेया प्रेमनाथ मांजरेकर (९१.२० टक्के) यांनी प्राप्त केले.
विद्यालयातून एसएससी परीक्षेला एकूण ८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
या सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत भगत, मुख्यकार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर, सचिव स. पा. आळवे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, माता पालक संघ, शिक्षक -पालक संघ यांनी अभिनंदन केले.