You are currently viewing . अर्धवट मैत्रीण
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

. अर्धवट मैत्रीण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*…. अर्धवट मैत्रीण…*

अर्धवट म्हणजे डोक्याने नाही हो.. हे लिहायला सुचवलय माझ्याच एका अर्धवट मैत्रीणीने म्हणजेच काय तर फेसबुकवर आपण फ्रेन्ड्स असतो पण आपण एकमेकांना ओळखत नसतो म्हणजे आपण भेटत नाही मग आपण मित्र कसे?? .. खरं तर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.. म्हणजेच अर्धवट मैत्री किवा मैत्रीण..
आपण सहज बोलुन जातो तो माझा मित्र किवा मैत्रीण.. पण एखाद्या कामासाठी किवा बोलायला फोन केला तर त्याला खरच वेळ असतो का आणि इच्छा असते का किवा कधी कधी त्याच्याकडे वेळही नसतो किवा त्याचा वेळ त्याला चॅटिंगवर वायाही घालवायचा नसतो..माझ्याबाबत असं बऱ्याचदा होतं मला सगळ्याना रिप्ल्याय करायला जमत नाही त्यामुळे समोरच्याचा गैरसमज होतो..
अर्धवट मित्र बऱ्याचदा काही वेळासाठी संपर्कात येतात काहीजण कायमस्वरूपी आपल्यासोबत रहातात.. काही जण न भेटताही आपल्याला जीव लावतात आपली काळजी करतात.. माझे वाचकमित्र असेच आहेत, प्रचंड प्रेम करतात .. जेव्हा जेव्हा अशी अर्धवट मंडळी संपर्कात येतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडुन काहीना काही आपल्याला वेचता यायलाच हवं.. अगदी आताचाच ताजा किस्सा सांगते.. एका गृपवरुन मला विचारण्यात आलं , मॅम तुम्हाला माझ्या गृपवर रहायचय कि समोरच्याच्या गृपवर?? .. खरं तर मी त्या दोघांनाही ओळखत नाही.. माझं लिखाण वाचण्यासाठी त्यांनी मला अनेक गृपवर ॲड केलय त्यामुळे ज्यांना वाटेल आम्हाला काहीतरी माझ्या लिखाणातुन उत्तम मिळतय त्यांनी त्याचा फायदा करुन घ्यावा.. कोणाचा गृप आहे याने कोणालाच काहीही फरक पडत नसतो.. त्याला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या पण त्याच्या हृदयापर्यत त्या किती पोचल्या माहीत नाही.. यालाच अर्धवटपणा म्हणत असावेत बहुधा.. 😃.. आपण वाचतो , ऐकतो पण स्वतःला बदलत नाही .. पण तरीही तिची अर्धवट मैत्रीण ही कंसेप्ट आवडली.. अर्धवट gf किवा bf असही असेल का हो?? .. पहा विचार करुन.. आणि नवरा बायको ते तर कायमच अर्धवट असावेत.. कारण तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना असेच अनेक संसार होत असतात.. बंद दारामागे काय काय होत असेल हे त्या अर्धवट लोकांनाच ठाऊक.. काय मग अर्धवटराव वाचुन नक्की विचार करा
अर्धवट फॉलो न करता पुर्ण करा..
अर्धवट आर्टीकल न वाचता पूर्ण वाचा
अर्धवट गोष्टीवर विश्वास ठेवु नका
अर्धवट मैत्रीपेक्षा पूर्ण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करुयात…

सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 5 =