You are currently viewing विश्वविक्रमी रांगोळीकार फास्टेस्ट वूमन इन द वर्ल्ड: पूजा अमोल काळे
Oplus_16908288

विश्वविक्रमी रांगोळीकार फास्टेस्ट वूमन इन द वर्ल्ड: पूजा अमोल काळे

 

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातल्या ढोलवड सारख्या एका गावात राहणाऱ्या पुजाची ही विजय गाथा समजल्यावर माझ्यासारखेच कुणालाही आश्चर्य कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. २ सप्टेंबर १९९६ मध्ये जन्म झालेली पूजा आज वयाची ३० वर्षे पूर्ण करीत असतांना तीन तीन विश्वविक्रम करते हे खरेच कौतुकास्पद आहे पुजाचा जन्म अहमदनगर म्हणजे आताचे अहिल्यानगर जिह्यातील श्रीरामपूरचा!

तिचे वडील अशोक थोरात हे चित्रकार, पेंटर व प्रोफेशनल आर्टिस्ट होते. त्यांना जुने हिंदी चित्रपट खूप आवडायचे तसेच जुण्या हिंदी गाण्यांचे चित्रपटांचे ते शौकीन होते. पूजा तीन महिन्याची असतांनाच तिची आई एका आजारपणात स्वर्गवासी झाली. तिच्या आजीने तिला खूप प्रेम दिले माया लावली. पूजा लहानपणी दिवसभर खेळत असायची चित्रकलेचा फार छंद तसेच मैदानी खेळातही ती आवडीने भाग घेत असे आजीची ती जीवकी प्राण होती. आजी थकलेली म्हणून वडिलांनी ती पाच वर्षांची असतांना दुसरे लग्न केले. घरात नवीन आई आली होती पण तिचा ओढा अर्थातच आजिकडेच जास्त होता.  आता दोन लहान भावंडाचा जन्म झाला होता वडीलही आजारी राहू लागले होते. म्हणून पुजा नववी झाल्यावर केवळ 18 वर्षाची असतांना वडिलांनी तिचे लग्न धोलवडच्या अमोल काळे शी करून दिले. त्यांचा पिढीजात धंदा शेती हाच होता परंतु लग्नानंतर तीन मुले झाल्यानंतर पूजा ने जिद्दीने १० वीची परिक्षा पूर्ण केली. तिचि मोठी मुलगी काव्या 6वित आराध्या पहिलीत तर मुलगा शिवराज अंगणवाडीत आहेत. मुलांबरोबर अभ्यासकरीत पूजा स्वतही यावर्षी 12 बोर्डाची परीक्षा देत आहे. २०१७ मध्ये तिचे वडील वारले पुजासाठी वडील म्हणजे तिचे दैवत होते. ते गेल्यावर त्यांच्या आठवण आली की मन रमविण्यासाठी ती पेंटिग करीत बसे लहानपणापासून वडिलाप्रमाणे तिलाही रंगात खेळणे आवडत होतेच रंगांची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने आपल्या घरच्या अंगणात रांगोळीत आकर्षकरित्या रंग भरणे सुरू केले. तिने काढलेल्या रांगोळ्या शेजारपाजारचे कौतुकाने पहायचे अधिक उत्साहाने ती अधिकच छान रांगोळी काढायची अशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आली तेंव्हा तिने काढलेली साधारण दहा फुटाची मोठ्ठी रांगोळी सगळ्यांनाच खूप आवडली आणि शाबासकीच्या रुपात तिला तेंव्हा पन्नास रुपये बक्षीस मिळाले ते पन्नास रुपये त्यावेळी तिला लाखमोलाचे वाटले. पूजाला सासरे नाहीत परंतु तिच्या सासूबाईंना तिचे खूप कौतुक आहे. मोठे दीर, जाऊ ह्यांनाही तिचा अभिमान वाटतो गावातच जेंव्हा पुजा रांगोळी काढत असे तेंव्हा तिच्या घरातल्याचा तिला विरोध नव्हता पण ज्यावेळेस तिने रांगोळीसाठी बाहेर जाणे सुरू केले तेंव्हा घरात कोणालाच ते फारसे आवडले नव्हते. पण सर्वत्र तिचे मोठ्या स्तरावरून कौतुक सुरू झाले तेंव्हा हळूहळू सगळ्यांचा विरोध मावळला नंतर श्री जैन मुनीच्या साधारण दोन किमीटर च्या आगमन मिरवणुकीत बेल्हे गावात रांगोळी काढली. पायघडी स्वरूपातली ही तिची पहिलीच रांगोळी होती त्यानंतर 2024 मध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीच्या देहू ते पंढरपूर या 261 कि मी पायी वारी सोहळ्यात रस्त्यामध्ये व दोन्ही बाजूनी पायघड्यास्वरूपात रांगोळ्या काढल्या या वारीसाठी तिला जवळपास साडेसहा टन रांगोळी लागली ह्यासाठी ओतूरच्या बोर्डरलेस पँथर्स ह्या समूहाने तिला 1 लाख 40 हजार रुपयांची मदत केली होती.

श्री दीपक सुकाळे यांनी हा समूह 2022 मध्ये सुरू केला आहे ह्या समूहाचे उद्दिष्टच माणूस की रुजवणे व वाढविणे हा आहे एव्हडी मोठी रक्कम पूजाला देऊन समूहाने आपल्या माणुसकीचे दर्शनच घडविले असे अभिमानाने म्हणावे लागेल पहिला वर्ल्ड रेकॉर्ड देहू ते पंढरपूर 262 की मी चा झाला तर दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड देहू ते पंढरपूर याच वारीत केला त्यावेळी वारीचा 340 वा सोहळा होता व पूजाने या वारीत 340 रांगोळ्या सात तासात काढल्या तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड श्री क्षेत्रदेहू ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत 252 की मी नॉनस्टॉप रांगोळी पायघडीचा झाला. काठेवाडी बारामतीत 45 सेंकडात तिने 36 स्क्वेअर फूट रांगोळी काढली तेंव्हा कै श्री अजित पवारांनी तिचे खूप कौतुक केले होते. त्यावेळचे फोटो पाहून आजही तिला गहिवरून येते त्यानंतर चौथा विश्वविक्रम तिने नुकताच काही महिन्या पूर्वी केला. निमित्त होते शिवजयंतीची तेंव्हा तिने शिवनेरीच्या पायथ्यापासून तो थेट वरपर्यंत रांगोळी काढली ह्यासाठी आदरणीय श्रीमती सुनेत्रा पवार ह्यांच्या हस्ते गडावर तिचा सत्कारही करण्यात आला.

देशसेवा हीच खरी पूजा असे मानणाऱ्या पूजाने नुकतीच इंडियन आर्मीचे नायब सुभेदार ह्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त दोन रांगोळ्या काढल्या वीर सैनिकाच्या कार्याला छोटासा मानाचा मुजरा हीच भावना या रांगोळी काढण्यामागे होती.

 

 

प्रतिभाताई पिटके, अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा