You are currently viewing सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबू अडूळकर यांचे निधन

सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबू अडूळकर यांचे निधन

वैभववाडी

वायंबोशी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबू भैरू अडुळकर उर्फ तात्या (87) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत अडुळकर यांचे ते वडील होत.
सेवा निवृत्ती नंतर ते सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले होते. निवृत्त शिक्षकांच्या समस्या तसेच जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात ते आग्रही असत. जेष्ठ नागरिक सेवा संघांचे ते सदस्य होते. मनमिळाऊ स्वभावामुळे ते तात्या या नावाने परिचित होते.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन विवाहित मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 7 =