You are currently viewing भाजपाकडून घडलेला कालचा प्रकार सावंतवाडीच्या संस्कृतीला निंदनीय…

भाजपाकडून घडलेला कालचा प्रकार सावंतवाडीच्या संस्कृतीला निंदनीय…

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस निरीक्षकांची भेट; अपकृत्यांना आळा घालण्याची मागणी…

सावंतवाडी

खासदार विनायक राऊतांचा पुतळा जाळून भाजपाकडून करण्यात आलेला निषेध हा सावंतवाडीच्या संस्कृतीला निंदनीय आहे. दरम्यान सध्यस्थीतत याठिकाणी सुरू असलेल्या प्रकारामुळे सावंतवाडीची वाटचाल आता कणकवलीच्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा कृत्यांना आळा घालण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे केली आहे. याबाबत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री.खोत यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी हिदायदुल्ला खान, दर्शना बाबर-देसाई, देवेंद्र टेमकर, नवल साटेलकर, अगस्तीन फर्नांडिस, जावेद शेख, कौस्तुभ नाईक, हर्षद बेग, याकुब शेख, अभिजित पवार, ईफतिगार राजगुरू, सुरेश वडार, अशोक पवार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − three =