You are currently viewing ओटवणेतील साबाजी पनासे युवकाची भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडो पथकात निवड

ओटवणेतील साबाजी पनासे युवकाची भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडो पथकात निवड

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणेचा साबाजी रामचन्द्र पनासे युवक अनेक आव्हानाचा सामना करत देशसेवेसाठी सज्ज झाला असून भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडो पथकात त्याची निवड झाली आहे. अशी कामगिरी करत या पथकात निवड होणारा कोकण पट्ट्यातील एकमेव युवक म्हणून त्याची निवड झाली आहे. ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर या प्रशालेत दहावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आर.पी.डी.कॉलेज मध्ये विज्ञान शाखेतूनही चांगली टक्केवारी मिळवत उत्तीर्ण झाला. मात्र या युवकाची स्वप्न ही इतरांपेक्षा ही वेगळी होती. तस बघितलं तर ओटवणे गावाला सैन्याचा मोठा वारसा नाही. मात्र सध्याची नवी पिढी सैन्यात दाखल होण्याची स्वप्ने बाळगून आहे. आणि हेच स्वप्न या युवकाने पाहिले आणि ते स्वप्न त्याला स्वस्त बसू देत नव्हत.

म्हटल जात सपने वो नही होते है जो सोनेके बाद आते है सपने वो होते है जो सोने नही देते आणि अशीच स्वप्ने उराशी बाळगत साबाजी तयारीला लागला वाट्टेल ते कष्ट करण्याची धमक, आई वडिलांचे आशिर्वाद कष्ट आणि मित्रमंडळीच मोलाच सहकार्य हे सर्व सोबत होतेच. पण त्याच बरोबर त्याच्या कष्टाना सिग्मा करिअर अकॅडमीने साथ दिली. सुरूवातीला एअरमन पदाच्या भरतीसाठी या अकॅडमी कडून मार्गदर्शन घेत सुरु केलेला प्रवास आज गरुड कमांडो पर्यंत आला.

अनेक खडतर आव्हाने पार करीत गरुड कमांडो पथकात जवळपास दीड वर्षाच्या प्रशिक्षणा नंतर भारतीय वायू सेनेच्या स्पेशल गरुड कमांडो पथकात निवड झाली. सध्या अशी निवड झालेला साबाजी हा कोंकणातील एकमेव युवक ठरला आहे. बेळगाव, उत्तरप्रदेश, आग्रा यासारख्या ठिकाणी अनेक प्रकारची प्रशिक्षणे ज्यात स्विमिंग, बेसिक ट्रेनिंग, गरुड ट्रेनिंग ब्रोबेशन, कमांडो प्रशिक्षण प्याराजंपिंग, ड्रायव्हिंग, अडवान्स स्किल सारखी खडतर प्रशिक्षणे त्याने घेतली. या प्रशिक्षणाचा चांगला फायदा झाला आणि याच्या जोरावरच त्यानी लीडींग एअरक्राफ्टमन पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल त्याचे आज कौतुक होत आहे. अनेक जण त्याचा गौरव करत आहेत मात्र हा प्रवास निश्चितच सहज आणि सोपा नव्हता. स्वप्नांना कठोर मेहनतीची जोड मिळाली आणि अभूतपूर्व यश मिळवत देशसेवेचे स्वप्न साकार झाले.

गेल्या एक दोन वर्षांत ओटवणेतील एकाच मांडवफातर या वाडीतील गणेश वर्णेकर, कृष्णा म्हापसेकर, निशा रेडकर हे युवा सैन्य दलात भरती झालेत आणि त्यांचीच प्रेरणा साबाजी सारखे युवक घेत असून अनेक जण सैन्यदलात जाण्याच स्वप्न बाळगत आहेत. आज अनेक तरूण तरुणीसाठी साबाजी पनासे हे एक आदर्श असून त्याची प्रेरणा घेत ध्येयाकडे पाऊल टाकल्यास एक दिवस ओटवणे गावही सैनिकांचा गाव म्हणून ओळखला जाईल यात शंकाच नाही. त्याच्या यशात साथ देणारे त्याचे आई वडील, भाऊ बहीण यांचेही विशेष कौतुक केले जात आहे. साबाजी हा सध्या प. बंगाल येथे भारतीय वायुसेनेत गरूड कमांडो म्हणून दाखल झाला असून अनेक मोठ्या जबाबदाऱ्या बरोबर विशेष मोहिमेची जबाबदारी पार पाडणार असून त्याच्या या कामगिरीला अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =