You are currently viewing कोरोचीत पोवार कुटूंबियांकडून संविधानिक मुल्यांची सजावट

कोरोचीत पोवार कुटूंबियांकडून संविधानिक मुल्यांची सजावट

इचलकरंजी / प्रतिनिधी

कोरोची येथे गणरायाला बुद्धिदेवता म्हणत असताना आपल्याला भारत देशात राहताना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार प्रदान करणारे संविधानाचा अभ्यास करणेची बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी सौरभ पोवार या युवकाने आपल्या घरी संविधानविषयक पोस्टर्स, अभंग आदिंची सजावट करुन लोकप्रबोधनासाठी गणेशोत्सव ही भूमिका गडद केली आहे.
आपल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत असलेली मूल्ये आपण रोजच्या जीवनात जगत असतोच ,फक्त आपण त्याकडे फार गांभीर्याने कधी पाहिले नसल्याने आणि आपला त्यावरचा अभ्यास नसल्याने आपले त्याकडे फारसे लक्ष जातच नाही. पण आपण या भारत देशात आज जे काही आहोत त्याचे मूळ हे भारतीय संविधान आणि त्यातील मूल्य आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. याचीच सगळ्यांना जाणीव व्हावी या उद्देशाने प्रास्ताविकेतील मूल्ये आणि त्यांचा अर्थ सोप्या शब्दांत सांगता येईल अशा आशयाने या देखाव्याची निर्मिती केली गेली.
घरी गणपती पहायला येणा-या लोकांना त्याने प्रसाद म्हणून प्रास्ताविका , टेबल पोस्टर आणि स्टिकर दिले आहेत.नुकताच अंनिसचे प्रधान सचिव शरद वास्कर यांनी सदर सजावटीचे कौतुक करत भेट दिली. यासाठी सौरभ पोवार याला सुनिल स्वामी, वडिल अविनाश पोवार आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + seventeen =