You are currently viewing आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांचे  विविध मागाण्यांसंदर्भात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन सादर 

आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांचे  विविध मागाण्यांसंदर्भात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन सादर 

आंबोली

कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांनी आंबोलीतील विविध विकास कामे त्वरीत होणेसाठी मागणी केली.

निवेदनात म्हटले की, मेनन च्या जमिनीतील 10 एकर जमिन क्रीडांगणासाठी मिळावी व तेथेच व्यायामशाळा सुरु करावी,) जकातवाडी येथिल तलाव दुरूस्त व सुशोभिकरण करावा )वन परिक्षेत्र आंबोली मार्फत घाटातील लहान मोठे सर्व धबधबे सुशोभिकरण करणे व त्या ठिकाणी कर आकारून त्यातुन घाट परीसर स्वच्छतेसाठी कचरा गाडी व कर्मचारी खर्च व देखभालीसाठी खर्च करणे, नांगरतास धबधबा दुरूस्त व सुशोभिकरण करणे, हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ काढणे, हिरण्यकेशीला जाणारा रस्ता रूंदी करण करणे व मंदीर परीसर सुशोभिकरण करणे व अत्यावश्यक सोई जसे बाथरूम चेंजिंग रूम, दुकान गाळे ,भक्त निवास उपलब्ध करावे, पर्यटन वाढीसाठी वॅक्स म्युझियम तयार करावा व आंबोलीतील जैव विविधता मार्गदर्शक सेंटर तयार करावा, नांगरतास येथिल बीएसएनएल टाॅवर सुरू करण्यासाठी निधी द्यावा, आंबोली पर्यटन स्थळ असल्यामुळे स्ट्रीटलाईटची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र त्याचे बिल पहीले जिल्हा परीषद भरत होती ते आता ग्रामपंचायतला भरावे लागते त्यामुळे या अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढावा, पर्यटन स्थळांवर व आवश्यक इतर स्थळांवर १०० बेंचची आवश्यक्ता आहे, )सर्व शाळांना ईंटरनेट कनेक्शनने जोडावे, जकातवाडी शाळेसाठी निधी उपलब्ध करावा, ऐतिहासीक महत्व असलेल्या आंबोली हायस्कूलसाठी सुशोभिकरणासाठी व क्रीडां साहीत्यसाठी निधी, आंबोलीत होऊ घातलेला हत्ती संवर्धन प्रकल्प तात्काळ रद्द करावा, )कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी, जे पुर्वापार चे वाड्यावस्त्यांवर जाणारे रोड आहेत डांबरीकरण करताना वन विभाग अडवत आहे त्या वर तोडगा काढणे, फणसवाडी धरण लघु पाटबंधारे विभागा अंतुर्गत येते त्या परीसरात ओपन गार्डन , बैठक व्यवस्था व बोटींग व वाॅक वे व सेल्फी पाॅईंट तयार करावे, मेनन च्या जमिनीत 10 एकर वर पेरू ची बाग आहे ती बचत गटांना देखभाल साठी दयावी, महादेवगड पाॅईंट येथे अॅडव्हेंचर पार्क व पॅरा शुट सेंटर व सेल्फी पाॅईंट व जाणारा रस्ता दुरुस्त करणे आदी मागण्या करण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − thirteen =