You are currently viewing गणेश आगमन

गणेश आगमन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गणेश आगमन*

झिरझिरणारा पाऊस पडदा,
घेऊनी आला आकाशाखाली !
सोबत होती मेघगर्जना ,
ढोल ताशांचे संगित भारी !

मधून दिसे ती दिव्य शलाका,
दामिनी चमके अभ्रातुनही !
साज रंगला सभोवताली,
गणमूर्तीच्या स्वागतासही!

धरती भिजली, आनंदी झाली,
सडा शिंपला मेघांनी !
संतोष तिचा पाहून सृष्टी ,
घाली रांगोळी नवरंगांनी !

लाल, पिवळी, निळी, पांढरी,
फुले ही सामिल रंगीत !
बाप्पाच्या स्वागता जमले सारे,
पाहून होई मीच अचंबित !

डौलातच हा येई भुवरी,
बसूनी छोट्या मूषकावरी!
सर्वांना आवडतो हा बाप्पा,
बघून त्याची ऐट खरी !

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + seventeen =