You are currently viewing आंबोलीत दुचाकी अपघात, जखमी बेशुद्ध असल्यामुळे ओळख पटविण्यास अपयश…

आंबोलीत दुचाकी अपघात, जखमी बेशुद्ध असल्यामुळे ओळख पटविण्यास अपयश…

आंबोली

येथील घाटात धबधब्यापासून काही अंतरावर एकाच दुचाकीस्वाराचा अपघात झाला. मात्र संबंधित दुचाकीस्वार बेशुद्ध असल्यामुळे त्याची ओळख पटत नाही. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे. हा अपघात सात वाजण्याच्या सुमारास येथील धबधब्या पासून काही अंतरावर घडला. त्याच्या गाडीचा नंबर एमएच ०७ एबी ०५१९ असा आहे. त्याचा रक्तदाब कमी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, गाडीचेही नुकसान झालेले नाही. याबाबतची माहिती आंबोली क्षेत्राचे पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =