You are currently viewing गणेश वंदना

गणेश वंदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित अप्रतिम गणेश वंदना*

*गणेश वंदना*

वंदन तूज हे गजानन
कार्यारंभी करु तव पुजन

पुष्प सुगंधी माळ कंठी
शेंदूर लाल भव्य ललाटी
रत्न हिरे शोभे शिरी मुकुटी
सगुणरुप सुंदर ते वदन
वंदन तूज हे गजानन

विघ्नहरा जय, जय लंबोदर
कलागुणांचा अवघा सागर
नाचे टाळ मृदंग तालावर
पायी पैंजण, वाजती रुणझुण
वंदन तूज हे गजानन

गणनायक सिध्दीफलदायक
वंदिती हरिहर ब्रह्मादिक
भक्तजनांचा तूचि तारक
स्मरता सरते भ्रम अज्ञान
वंदन तूज हे गजानन

आता मागणे इतुके देवा
निशीदिन घडू दे मंगल सेवा
ज्ञान बुध्दीचा द्यावा ठेवा
अहंकाराचे होवू दे हवन
वंदन तूज हे गजानन

चंद्रशेखर द. धर्माधिकारी
पुणे©️

प्रतिक्रिया व्यक्त करा