You are currently viewing कुडाळात विक्रेत्यांचा तात्पुरत्या स्वरूपात जागेचा प्रश्न मार्गी..

कुडाळात विक्रेत्यांचा तात्पुरत्या स्वरूपात जागेचा प्रश्न मार्गी..

कुडाळ :

 

कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने अखिल पोलीस स्टेशन नजीकच्या मोकळ्या त्रिकोणी जागेत भाजी, फळ विक्रेत्यांसह फिरत्या विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. नगरपंचायत प्रशासनाने या जागेतून विक्रेत्यांना चार दिवसापूर्वी उठून कारवाई केली होती. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने आणि विक्रेते समोरासमोर आले होते. गणेशोत्सव कालावधीत ही जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या विक्रेत्यांनी केली होती. त्यामुळे नागरपंचायत प्रशासनानेही नमती बाजू घेतली व तात्पुरते स्वरूपाची जागा या विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त करत त्या जागेत दुकाने थाटली असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. नगरपंचायतच्या या निर्णयाबाबत विक्रेत्यांनी समाधान व्यक्त करीत रविवारपासून दुकाने थाटली. गणेशोत्सव कालावधी पुरतीच ती जागा तात्पुरते स्वरूपात विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून दिल्याचे नगराध्यक्ष सौ आफरीन करून व उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा