You are currently viewing नानेली येथील मृताच्या नातेवाईकांना भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत यांच्याकडून १० हजाराची मदत..

नानेली येथील मृताच्या नातेवाईकांना भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत यांच्याकडून १० हजाराची मदत..

कुडाळ :-

 

माणगाव नानेली येथील रहिवासी कै रामचंद्र सदानंद घाडीगावकर हे कोल्हापूरला कामानिमित्त असताना अचानक त्यांचे निधन झाले. घरातील कमावता व्यक्ती केल्याने घाडीगावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबाला सावरण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्याकडून माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोख १० हजार रुपयाची मदत घाडीगावकर कुटुंबीयाला आज करण्यात आली. यावेळी श्री भाई सावंत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, श्री रुपेश कानडे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष कुडाळ, श्री स्वरूप वाळके, श्री राजवीर पाटील, श्री प्रमोद दळवी माजी सरपंच नाणेली, श्री धुरी श्री कृष्णा सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा