You are currently viewing कणकवलीत खरेदीसाठी उसळली तुडुंब गर्दी

कणकवलीत खरेदीसाठी उसळली तुडुंब गर्दी

नगराध्यक्ष समीर नलावडे पटवर्धन चौकात देखरेखीसाठी हजर

कणकवली

गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासूनच कणकवलीत खरेदीसाठी गणेशभक्तांची तोबा गर्दी उसळली होती. बाजारासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक अभि मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण हे सकाळपासूनच पटवर्धन चौकात हजर होते.
भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देखरेख करण्यात आली. कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुक हवालदार प्रकाश गवस, हवालदार चंद्रकांत माने, पोलीस नाईक विनोद चव्हाण लक्ष ठेवून आहेत. गणेशचतुर्थीला माटी सजावटीसाठी शेरवाड, दोडे सुपारी, हरणं, आदी साहित्य ग्रामीण भागातून विक्रीसाठी आले आहे. तसेच शहाळी, गावठी भाजी देखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली असून चतुर्थी च्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बाजारपेठेत उसळली आहे. कणकवली शहर बाजारपेठेत दिवसभराच्या व्यवहारानंतर कचरा उचलण्यासाठी सायंकाळी 7 नंतर पटकीदेवीपासून सुरवात करण्याच्या सूचना नगराध्यक्ष नलावडे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − one =