You are currently viewing गणेशोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ मालवण वासियांना पूजेच्या साहित्याची भेट

गणेशोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ मालवण वासियांना पूजेच्या साहित्याची भेट

मालवण :

 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवानिमित्त कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेच्या विविध साहित्याची भेट दिली आहे.

यामध्ये अगरबत्ती, तेल, कापूर, खडीसाखर, गणपती कॅलेंडर, पिशवी हे साहित्य भेट स्वरूपात देण्यात येत आहे. मोठ्या उत्साहात या साहित्याचे वाटप सुरु करण्यात आले असून चिमुकल्या मुली, मुले देखील यात सहभागी होऊन घरोघरी साहित्य पोच करीत आहेत.

गेली अनेक वर्षे आमदार वैभव नाईक भक्तिभावाने आवडीने हे विविध साहित्य भेट देत आहेत.

आ. वैभव नाईक यांनी दिलेली हि प्रेमाची भेट कुडाळ मालवण तालुक्यात प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक मेहनत घेत आहेत.

रात्र रात्र जागून कार्यकर्ते हे साहित्य पिशव्यांमध्ये पॅक करून घराघरात पोहचवित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 7 =