You are currently viewing मालवण-देवबाग रस्ता ह्यावर्षी देखील खड्डेमय..

मालवण-देवबाग रस्ता ह्यावर्षी देखील खड्डेमय..

गणेशोत्सवाला काहीच आठवडे शिल्लक,  तरीही प्रशासन झोपेतच

प्रतीक कुबल – अध्यक्ष म. न. वि. सेनेचे तारकर्ली-देवबाग मतदार संघ

कोकणात मोठ्या थाटात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला अवघे काही आठवडे उरले आहेत गणपती च्या शाळांमधून गणपती न्यायला काही दिवसांनी चालू होतील त्यात मालवण ते देवबाग हा रस्ता ह्यावर्षी देखील खड्डेमय असल्याचे पाहण्यात येत आहे.

गेल्यावर्षी प्रशासनाकडून विनंती अखेर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. परंतु मालवण ते देवबाग रस्ता कधी होईल ह्याचे अद्याप उत्तर समोर येत नाही आहे वारंवार खड्यांमुळे अपघाताचे व वाहन नुकसानींनचे सत्र हे कायम चालूच असते तरी दरवर्षी खड्यांची संख्या हि वाढतच आहे. त्यात असंख्य ठिकाणी खड्यांमुळे पाणी साचण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. प्रवास करताना नोकरदार वर्गाला आणि मुख्यतः स्थानिक मच्छिमारांना वाहतुकी दरम्यान ह्याची कळ सोसावी लागत आहे,त्याच बरोबर रुग्णाचे व गरोदर महिलांचे प्रवास करताना होणारे हाल हे सर्व न्यात असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपेत असल्याचे दिसून येत आहे ह्या गोष्टीमध्ये लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून हा प्रलंबित मालवण-देवबाग रस्ता नव्याने व्हावा यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी आग्रही विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने चे तारकर्ली-देवबाग मतदार संघाचे विभाग अध्यक्ष प्रतिक कुबल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =