You are currently viewing महावितरण कंपनीकडून ग्राहकांची भरमसाट लुटमार : नंदकुमार घाटे

महावितरण कंपनीकडून ग्राहकांची भरमसाट लुटमार : नंदकुमार घाटे

देवगड :

जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून वाढीव वीजदर आकारणी करून ग्राहकांची भरमसाट लुटमार होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. महावितरणकडून प्रत्येक महिन्याच्या बिलात वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा खेळ करून (इंधनसमायोजन, वहन आकार, वीज शुल्क, स्थिर आकार) विविध आकारांचा अन्यायकारक बिलात समावेश करण्यात आला आहे. आज सामान्य जनता वाढलेल्या जाचक बिलातून सुटका करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी वीज वितरण विभागाचे उप विभागीय अधिकारी एन.एन शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून वाढीव वीजदर आकारणी करून ग्राहकांची भरमसाट लुटमार होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. महावितरणकडून प्रत्येक महिन्याच्या बिलात वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा खेळ करून (इंधन समायोजन, वहन आकार, वीज शुल्क, स्थिर आकार) विविध आकारांचा अन्यायकारक बिलात समावेश करण्यात आला आहे. आज सामान्य जनता वाढलेल्या जाचक बिलातून सुटका करून घेण्यासाठी पुर्वीप्रमाणे दिवाबत्तीच्या शोधात आहेत. मात्र पुर्वी मिळणारे केरोसीन सुद्धा शासनाने बंद केले आहे.

अधिक बातम्यांसाठी वाचा

‘त्या’ रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार मंत्री रविंद्र चव्हाणांची ग्वाही

त्यामुळेच महावितरण वीज ग्राहकांवर अन्यायकारक वीज बीले माथी मारत आहे. ही अन्यायकारक वीज दरवाढ तात्काळ थांबवण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वीज ग्राहकांना सोबत घेऊन धडक आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गणेशोत्सव जवळ येत आहे. अशावेळी सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत राहिल्यास गणेश भक्तांमधील नाराजी वाढू शकते. यासाठी गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी. वीज वाहिन्यांना स्पर्श करणारी रस्त्यालगतची झाडी तोडून घेण्यात यावी. नादुरूस्त विद्युत उपकरणे तातडीने बदलण्यात यावीत. यासाठी वरिष्ठ
कार्यालयाकडून नवीन विद्युत साहित्य वेळीच उपलब्ध करून घेण्यात यावे. त्यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्याची जनतेची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी उपविभागीय अधिकारी एन.एन शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळीजिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर,श्यामकांत शेडगे,नागेश आचरेकर,बाबू वाळके,विश्वनाथ तेली, जयराम कदम, सरचिटणीस शरद शिंदे,सुधीर देवगडकर,उदय रमडे,कृष्ण परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =