You are currently viewing निरोगी आणि सुदृढ आयुष्याचा जुनीच उपचार पद्धती पुन्हा नव्याने…!

निरोगी आणि सुदृढ आयुष्याचा जुनीच उपचार पद्धती पुन्हा नव्याने…!

बांदा, कट्टा कॉर्नर येथे सुरू झालं कांस्यथाळी मसाज केंद्र

दिवसेंदिवस उत्पन्न होणारे रोग आणि खतयुक्त, केमिकल युक्त अन्नधान्य खाऊन मानवामध्ये उत्पन्न होणाऱ्या व्याधी, धावपळीचे जीवन आणि व्यायामाची कमी आदी अनेक कारणांमुळे अवघ्या तिशीतच युवकांना अनेक रोगांचा सामना करण्याची वेळ आली आहे. युवापिढी पासून वयोवृद्धांना डायबिटीस, उच्चरक्तदाब, नेत्रदोष, हात पाय दुखणे, सांधे दुःखी, पाठ, कंबर दुःखी, केस गळती, मानसिक ताण तणाव, वात, पित्त, कफ दोष, निद्रानाश, थकवा अशा अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी पुन्हा एकदा अलोपॅथीच्या उपचारातून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी लोक आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नेचरोओपॅथी उपचार पद्धती अवलंबू लागले आहे.
आपल्या शरीरातील अनेक रोग हे हात पायांच्या तळव्यातून होणाऱ्या उपचारांमधून बरे होत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. ऍक्युपंक्चर द्वारे अनेक व्याधींवर उपचार केले जातात. यातीलच पूर्वीपासून सर्वांना ज्ञात असणारा प्रकार म्हणजे पादाभ्यंग…! यामध्ये काश्याच्या वाटीच्या सहाय्याने पायाच्या तळव्यांना तेल लावून मसाज केला जायचा. त्यामुळे पूर्वीचे लोक व्याधीमुक्त असायचे. अशीच जुनीच परंतु नव्याने गरज बनलेली कांस्यथाळी मसाज उपचार पद्धती घेऊन न्हावेली येथील तरुण निसर्गोपचार तज्ञ श्री.रामचंद्र परब व श्री.शशिकांत परब (आयुर्वेदिक तज्ञ) आपल्या भेटीस आले आहेत.
पूर्वीच्या काळात वयोवृद्ध व्यक्ती ज्या शारीरिक व मानसिक तणाव त्रास अनुभवत असतात त्यातून पुरेपूर मोकळीक मिळून मन व शरीर सुदृढ रहाते ते सुद्धा कोणत्याही केमिकल युक्त गोळ्यां शिवाय अगदी माफक दरात… फक्त वृद्धच नाही तर अगदी लहान मुलांपासून ते तरुणपिढीने सुद्धा याची प्रचिती घ्यायला हवी.. खरतर ही खूप जुनी उपचार पद्धती आहे परंतु दुर्दैवाने ती कमी होत गेली… या उपचाराने होणारे काही ठराविक फायदे म्हणजे…
१. रक्त प्रवाह सुरळीत होतो.
२. रक्तदाब अवाक्यात राहतो.
३. मानसिक ताण तणाव कमी होतो.
४. शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होते.
५. गुढगेदुखी, कम्बरदुखी आणि टाचदुखी कमी होते.
६. शरीरातील वाताचे प्रमाण कमी होते.
७. निद्रानाशाचा परिणाम कमी होऊन शांत झोप लागते.
८. शारीरिक थकवा कमी होतो.
९. शरीरातील टॉक्सिक मसाज द्वारे कमी होते त्यामुळे थकवा जाणवणे कमी होते.

असे अजून बरेच फायदे होतात. अगदी सिंधुदुर्ग नव्हे तर कोल्हापूर, मुंबई आणि गोवा इथून माणसे श्री.शशिकांत परब (आयुर्वेद तज्ञ) व श्री.रामचंद्र परब (निसर्गोपचार तज्ञ) यांना भेटून उपचार घेत असतात.. त्यांनीच ही प्राचीन उपचार पद्धत पुन्हा नव्याने चालू केली आहे. जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा मिळेल ते ही अगदी माफक दरात.. एकदा भेट देऊन आपण याची खात्री करू शकता आणि मनाबरोबर शरीराला देखील सुदृढ ठेऊ शकता……

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 6 =