You are currently viewing मुंबईतील आरे जंगलाच्या संवर्धनासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन

मुंबईतील आरे जंगलाच्या संवर्धनासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन

सिंधुदुर्ग

मुंबईतील आरे जंगलाचे संवर्धन व्हावे, मेट्रो कारशेड साठी जंगलाची तोड होऊ नये,अशा आशयाचे निवेदन प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे सचिव सच्चिदानंद बुगडे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना दिले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवार यांनी हे निवेदन स्वीकारले.
मुंबई मेट्रो कारशेड उभारण्याचा पर्यावरण व जनहित विरोधी निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे..सदर आरे जंगल भविष्यत ही जंगल म्हणून कायम रहावे, म्हणून २०१९ पूर्वीचा फडणवीस सरकारचा निर्णय मविआ सरकारने रद्द करत मेट्रो कारशेड साठी अन्य जागा उपलब्ध करून दिली होती..पण नवीन शिंदे फडणवीस सरकारने तो मविआ सरकारचा निर्णय बदलत परत आरे येथेच हजारो झाडांची कत्तल करून होणारा मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.आरे जंगलं हे मुंबईची फुफ्फुसे आहेत,जर हे जंगल नष्ट झाले तर भविष्यात पर्यावरणास म्हणजेच सर्व जीवितास धोका निर्माण होणार असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा