You are currently viewing कॅलिफोर्निया 30 फर्मला स्टेपिंग दोन शाळेतील विद्यार्थ्यांची अविस्मरणीय क्षेत्रभेट 

कॅलिफोर्निया 30 फर्मला स्टेपिंग दोन शाळेतील विद्यार्थ्यांची अविस्मरणीय क्षेत्रभेट 

सावंतवाडी

दि.२५ ऑगस्ट २०२०, गुरूवार या दिवशी सेटिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाला अनुसरून कॅलिफोर्निया 30 फार्म या क्षेत्राला भेट दिली. या कॅलिफोर्निया फार्मचे निर्माते श्री. सुमित भोसले यांनी विविध झाडांविषयी माहिती दिली. नगदी पिके कशी वाढवावी या योजनेविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्या झाडांचे उपयोग सांगितले. तसेच बकरी, गाई या पाळीव प्राण्यांची देखभाल कशी करतात या बद्दलही माहिती सांगितली. या पाळीव प्राण्यांसाठी त्यांनी राहायची केलेली सोय व स्वच्छता स्वतः विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाल्या. तसेच प्राण्यांच्या विष्ठेपासून खत निर्मिती कशी केली जाते याचेदेखील विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीचा माध्यमाने ज्ञान प्राप्त झाले. या प्राण्यांना उपयुक्त असे विविध झाडांपासून, त्यांच्या पानांपासून होणारी खाद्यनिर्मिती याचे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात आले. जातीच्या बकऱ्या, पशु विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सहवासात राहून या क्षेत्रभेटीच्या माध्यमाने उत्तम ज्ञान प्राप्त केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला अधिकच चालना मिळाली. शेवटी विद्यार्थ्यांनी या फार्मचे निर्माते श्री. सुमित भोसले यांना लहानशी भेट म्हणून ‘वृक्ष’ देऊन आभार प्रदर्शन केले. या क्षेत्रभेटीची सुवर्णसंधी साधून व स्वतः निसर्ग सहवासात विज्ञान विषयक व नैसर्गिक ज्ञानग्रहण करून विद्यार्थ्यांनी या भेटीचा आनंद लुटला.

प्रतिक्रिया व्यक्त करा