You are currently viewing पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोसिएशन च्या अध्यक्ष पदी सौ.पूजा सरकारे यांची एकमताने निवड

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोसिएशन च्या अध्यक्ष पदी सौ.पूजा सरकारे यांची एकमताने निवड

– श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरजेटी येथे गेले 20 वर्षापेक्षा जास्त काळ स्थानिक व्यासायिकांच्या माध्यमातून 35 पेक्षा जास्त स्टॉलधारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपति श्री शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या देशविदेशातील लाखो पर्यटक,शिवप्रेमी यांना सेवा पुरवीत आहेत त्यामुळे गेले अनेक वर्षे येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही गैरसोयींना सामोरे जावे लागत नाही याबंदरजेटी परिसरात उभे असलेले स्टॉल हे मेरीटाईम बोर्डाच्या मालकीच्या जमनीत असल्यामुळे सदर स्टॉल काढून टाकण्यासाठी शासनाच्या कारवाईच्या नोटिसां कायम स्वरूपी व्यावसायिकांना येत असल्यामुळे बेरोजगार होण्याची भीती कायम व्यवसायिकांवर आहे .या संबंधी येथील स्टॉल धारकांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर महासंघा मार्फत सदर विषयी मार्ग काढून व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी महासंघ पूर्ण पणे स्टॉल धारकाच्या सोबत असून यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्ची मालवण बंदरजेटी स्टॉलधारक असोशिएशन स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष पदी सौ .पूजा सरकारे यांची निवड महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केली.या वेळी महासंघाच्या मालवण महिला तालूका अध्यक्ष मेघा सावंत यांच्या हस्ते पुष्यगुश्य त्यांना देण्यात आला .महासंघाच्या माध्यमातून मेरीटाईम बोर्ड विभागास पत्रव्यवहार करुन सदर स्टॉल धारकास पर्यटन पूरक स्वरूप असलेले स्वखर्चातून उभारलेले आर्कषक स्टॉल ला व्यवसाय करण्यास जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असून सदर स्टॉल ची डिझाईन साठी श्री गुरुनाथ राणे यांना सर्वानुमते जबाबदारी दिली आहे या विषयी कायमस्वरूपी मार्ग काढण्यात येणार आहे यावेळी महासंघ खजिनदार श्री गुरुनाथ राणे ,लिकर असोशिएशन जिल्हाध्य्क्ष श्री शेखर गाड,मालवण शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर ,श्री विनायक परब तसेच स्टॉल धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =