You are currently viewing जवान रात्र

जवान रात्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच जनसंपर्क अधिकारी लेखक कवी श्री.विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जवान रात्र*

जरी वाढलेय वय अजूनही मी लहान
सखये घे जवळी रात्र आजची जवान.

पितेय टिपूर चांदणं फांदीवरील पान
काजव्याची जोडी गाते मस्त प्रेमगान
अमीट अधर मागती दिव्य अमृतपान
सखये घे जवळी रात्र आजची जवान .

घेतले रजनीने आज निळे पांघरूण
कर साज शृंगार ये नीलांबरी होऊन
चैत्र पालवी फुटलेली बेकाबू दोन जान
सखये घे जवळी रात्र आजची जवान .

बहरला गुलमोहर झाडून पान न पान
चोरुन पाहण्या पारवा बसलाय टपून
फांदीवरील राघू देतो मैनेला प्रेमदाम
सखये घे जवळी रात्र आजची जवान .

स्वप्न दोघांचे पाळू नको कुठले बंधन
वाहतात अवती भवती स्वर्गीय पवन
गूज अंतरीचे गूढ प्रिये तू घे जाणून
सखये घे जवळी रात्र आजची जवान.

चैत्र पल्लव मन निशा काळोखी बेभान
केश संभार मोकळा श्वास वाढला वेगानं
घालतो साद ही निशा ना येईल फिरून
सखये घे जवळी रात्र आजची जवान.

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 12 =