You are currently viewing ठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत असंवेदनशील….

ठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत असंवेदनशील….

– भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चा तर्फे जिल्हा अधिकारी यांना निवेदन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार विनयभंग व हत्याकांड च सत्र सुरूच आहे. यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळात हे कोविड सेंटर हॉस्पिटल मधील महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरूच आहे.
भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनाचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटने बाबत निवेदन पाठवले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्री यांनी दाखवली नाही. किती असंवेदनशील व निष्क्रिय सरकार आहे हेच त्यावरून स्पष्ट होते.
या सरकारचा प्रश्नावर देखील अंकुश नसल्या मुळे महिला अत्याचाराच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही. ही वस्तुस्थिती असल्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्रातर्फे दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर हॉस्पिटल मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवशी आंदोलन करण्यात आलेले होते. परंतु तरीही हा संवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे दिनांक 12 ऑक्टोबर रोजी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी आक्रोश आंदोलनांतर्गत निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा महिला मोर्चा तर्फे महिलांवर वाढत्या अत्याचार विरोधात झोपलेल्या आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भाजप महिला मोर्चा तर्फे आज राज्यभर आक्रोश आंदोलन आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चा च्या वतीने आज रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरे यांनी ठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत किती असंवेदनशील आहे हे सांगितले आहे.
त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. समिधा नाईक, महिला जिल्हा अध्यक्षा संध्या तेरसे, माजी जिल्हा अध्यक्षा राजश्री धुमाळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सावी लोके, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, अस्मिता बांदेकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाही सावंत, प्रभाकर सावंत,ओरोस मंडल अध्यक्षासुप्रिया वालावकर, स्नेहा सावंत, सजली मालकर, सेजल पाटकर, राज्यश्री ओळकर, साक्षी कोचरेकर, जयश्री चव्हाण, नीता जुवेकर, नेहा परब, आरती वारंग, समिधा पालव, नेहा चौगुले, माधवी पालव तसेच पोरस मंडळातील अन्य महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 2 =