बोटवर तीन एके ४७ रायफल्स, काही जिवंत काडतूसे आणि इतर साहित्य
रायगड :
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे दोन संशयास्पद बोट आढळून आल्या आहेत. इतकेच नाही तर या बोटवर तीन एके ४७ रायफल्स, काही जिवंत काडतूसे आणि इतर साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या बोट संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
ही संशयास्पद बोट यूकेमधील एका कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. रायगड पोलिसांना दोन व्यक्तींची माहिती मिळाली आहे. त्या संदर्भात काही कागदपत्रे मिळाले असून ते दोन्ही नागरिक इंडोनेशियाचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका ऑस्ट्रेलियन व्यक्ती संदर्भातही काही माहिती पोलिसांना मिळाली आहे. बोटवर हे सर्व कागदपत्रे आढळून आले आहेत. आता हे नागरिक कुठे आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत.