You are currently viewing मालवणात दिव्यांग बांधवाना ९ लाख निधीचे वितरण….

मालवणात दिव्यांग बांधवाना ९ लाख निधीचे वितरण….

मालवण

मालवण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवाना ९ लाख रुपये दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले आहे.

यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर निधि लवकर मिळावा अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी पालिकेकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने तात्काळ कार्यवाही पूर्ण करत ११० दिव्यांग बांधवांच्या खात्यात निधी जमा केला आहे. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

बांधील खर्च वजा जाता नप महसूल उत्पन्नाच्या ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी अनुज्ञय आहे. कोरोना लॉकडाऊन पार्श्वभूमी लक्षात घेता यावर्षी लवकरात लवकर निधी जमा करावा. अशी मागणी नगराध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली होती. त्या दृष्टीने सकारात्मक विचार करुन शहरातील सुमारे ११० दिव्यांग बांधवांना ९ लाख ५ हजार वाटप करण्यात आला आहे. यामधे ८० ते १०० टक्के दिव्यांग – १५ हजार, ६० ते ८० टक्के दिव्यांग – १० हजार, ४० ते ६० टक्के दिव्यांग – ५ हजार अश्या प्रकारे रक्कम दिव्यांगांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत.

कोणी अपंग बांधव या निधि पासुन वंचित राहिले असल्यास त्यानी आवश्यक कागदपत्रे घेवून मालवण नप प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहनही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

दिव्यांग संघटनेने मानले आभार

दिव्यांग बांधवाना दिव्यांग निधीचा जास्तीत जास्त लाभ व्हावा. यासाठी सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना मालवण शहरच्या वतीने प्रशासन स्तरावर नेहमीच आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर परिस्थितीचा विचार करून लवकर निधी जमा व्हावा. ही मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल घेत ती तात्काळ पूर्ण केल्याबद्दल संघटनेचे मालवण शहर अध्यक्ष सत्यम पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व पालिकेचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − one =