मृत ज्वालामुखीचा उद्रेक…

मृत ज्वालामुखीचा उद्रेक…

नवी दिल्ली

आइसलँडच्या एका ज्वालामुखीत विस्फोट झाला आहे. आइसलँडची राजधानी रेक्याविकपासून जवळपास 32 किलोमीटर दूर असणाऱ्या या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने सांगितलं की, आइसलँडची राजधानी रेक्याविकमध्ये असलेल्या रेक्येनीस पेनिनसुलामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.

फगराडल्स डोंगरावर असलेला 800 वर्षांपूर्वीपासूनचा हा ज्वालामुखी मृत होता. दरम्यान, आता या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर येत आहे. तसेच 32 किलोमीटर अंतरावरुनही हा ज्वालामुखी दिसून येत आहे. तसेच रिहायशी परिसरापासून हा ज्वालामुखी अत्यंत दूर आहे. या ज्वालामुखीजवळून जाणारा रस्ताही त्यापासून 2.5 किलोमीटर आहे. तिथूनही ज्वालामुखीचा धगधगता लाव्हा अगदी स्पष्टपणे दिसत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा