You are currently viewing इचलकरंजीत वास्तू 2022 प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा थाटात

इचलकरंजीत वास्तू 2022 प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा थाटात

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी येथील केएटीपी मैदानावर आयकॉन स्टिल प्रायोजित तसेच असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी, इचलकरंजी सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, इचलकरंजी बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉट्रॅक्टर असोसिएशन या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ‘वास्तू 2022 प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला.

 

इचलकरंजी शहर परिसरात असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी, इचलकरंजी सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, इचलकरंजी बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉंट्रॅक्टर असोसिएशन या सर्व बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर संस्था आहेत.या संस्थांच्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी मानून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.सर्व स्तरातील नागरिकांना स्वप्नातलं घर साकारता यावं , यासाठी देखील या संस्थांचा प्रामाणिक प्रयत्न असतो.याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी येथे केएटीपी ग्राऊंडवर

असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी, इचलकरंजी सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, इचलकरंजी बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉंट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयकॉन स्टिल प्रायोजित वास्तू प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंञी यड्रावकर यांनी बदलत्या काळात बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कमीत कमी खर्चात घरकुल उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी गेल्या काही वर्षापासून जटील बनलेला गौण खनिज उत्खननबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत शहराचा टीपी-1 व टीपी-2 प्रश्न लवकरच निकालात काढू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

यावेळी आम.प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहर हे अत्याधुनिक टेक्स्टाईल म्हणून आंतरराष्ट्रीय परिचित आहे. शहराला एक्स्पोर्ट सिटी बनवण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहे. राज्य शासनानेसुध्दा या वस्त्रोद्योगाला पुढे नेण्यासाठी प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्ण कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गौण खनिज उत्खनन, पंचगंगेतील गाळ काढण्यासंदर्भात केंद्राच्या अटींमुळे अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, वास्तू कमिटीचे चेअरमन नितीन धूत ,क्रेडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयुर शहा, विवेक सावंत, संजय रुग्गे, अनिल मनवाणी, रमेश मर्दा, बळीराम घायतिडक, संदीप जाधव, विकास चंगेडीया, सुधाकर झोले, प्रितीश शहा, विठ्ठल तोडकर, घनश्याम सावलानी, महांतेश कोकलकी, सुहास अकिवाटे, जहीर सौदागर, सय्यद गफारी, अभय पिसे, सचिन बोरा, मुकुंद ओझा, राजू पाटील, राजेंद्र खंडेराजुरी, गजानन ढवळे, महेश महाजन, पन्नालाल डाळ्या, कुमार माळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ,मान्यवर व बांधकाम क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा