छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालुन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे कार्य सदैव करीत राहीन”

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालुन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे कार्य सदैव करीत राहीन”

–शिवसेना नेते संदेश पारकर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारे पुस्तक देऊन संदेश पारकर यांचा सत्कार

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आणि आक्रमक राहणारे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष युवानेते श्री.संदेश पारकर यांचा अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनिल काकडे, आदिनाथ डमाले आणि प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते प्रा.सिताराम काकडे यांनी संदेश पारकर यांनी आजपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा कथन करणारे पुस्तक देऊन संदेश पारकर यांचा सत्कार केला.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालुन सर्वसामान्य जनतेला न्याय आणि हक्क देण्याचे कार्य मी सदैव करीत राहीन,” अशी ग्वाही यावेळी संदेश पारकर यांनी दिली. यावेळी श्री.पारकर यांना उज्वल राजकीय कारकिर्दीसाठी अहमदनगरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. या सत्काराबद्दल संदेश पारकर यांनी या सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा