You are currently viewing …त्या अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही : महेंद्र सांगेलकर

…त्या अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही : महेंद्र सांगेलकर

सावंतवाडी :

 

कोरोनाकाळात २ वर्ष डंपर व्यवसाय ठप्प होता. या दरम्यान बँकांचे हप्ते व्यवसायिक भरत होते. त्यात नुकताच मायनिंग व्यवसाय सुरू झाला असून भविष्यात पावसाळा आहे. काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव आणत डंपरांवर कारवाई केली जात आहे. या संदर्भात परिवहन विभागाच लक्ष वेधणार असून परिवहन राज्यमंत्री बंटी पाटील यांचही लक्ष वेधणार आहे. तर राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सावंतवाडीत फिरू देणार नाही असा इशारा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा