You are currently viewing घुमडाई मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी 

घुमडाई मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी 

घुमडाई मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी

मालवण :

मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात रामनवमी उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. सकाळी मंदिरात स्थानिकांची भजने, दुपारी १२ वा. रामजन्म पार पडल्या नंतर मंदिराच्या भोवती पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. या सोहळ्यात घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याठिकाणी दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी स्थानिकांची भजने आणि महिलांचे कार्यक्रम होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा