You are currently viewing इचलकरंजीत विश्व हिंदू परिषदेच्या मशाल पदयाञेस उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजीत विश्व हिंदू परिषदेच्या मशाल पदयाञेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त आयोजन

 

इचलकरंजी :

 

इचलकरंजी येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अखंड भारत संकल्प दिवस म्हणून मशाल पदयात्रा काढण्यात आली.शहरातील छञपती शाहू पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यान काढण्यात आलेल्या या मशाल पदयाञेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी भारतमाता की जय ,वंदे मातरम् अशा जयघोषाने संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.

१४ ऑगस्ट १९४७ रोजी अखंड भारत देशाचे विभाजन होवून त्यातून भारत व पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली.त्यामुळे भारत देश पुन्हा एकदा गतवैभवाने एकसंघ होवून सर्व जात ,पात ,पंथ , संप्रदाय , वर्णभेद व प्रांत विसरुन अखंड भारत म्हणून उदयास यावा ,यासाठीच १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने इचलकरंजी येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी अखंड भारत मशाल पदयाञेचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील छञपती शाहू पुतळा येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ,शिवजी व्यास,श्री.लाहोटी ,विजय पाटील यांच्या हस्ते पविञ मशालीचे पूजन करुन या पदयाञेस सुरुवात करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय रायफल शूटर हिंमत जाधव , सुवर्णपदक प्राप्त बाॅक्सिंग खेळाडू कृष्णा नेहरिया व वीर रेस्कू फोर्सच्या जवानांना मशाल वाहकाचा मान देण्यात आला.भारतमाता की जय ,वंदे मातरम् अशा जयघोषाने व देशभक्तीमय वातावरणात ही मशाल पदयात्रा छञपती शाहू पुतळा ते मुख्य रस्त्यावरुन शिवतीर्थ परिसर ,जनता चौक या मार्गे महात्मा गांधी पुतळा येथे आणण्यात आली.या पदयाञेत दुर्गावाहिनी व वीर रेस्कू फोर्सच्या जवानांनी लाठी – काठी व शूरता दाखवणारे प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर करण्यात आले.यावेळी व्याख्याते राजेंद्र आलोने यांनी अखंड भारताची संकल्पना,भारत देशाची संस्कृती व परंपरा याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.महात्मा गांधी पुतळा येथे अखंड वंदे मातरम् सादर करुन या मशाल पदयाञेची सांगता करण्यात आली.यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी , सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 12 =