You are currently viewing तळेरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांचे मार्गदर्शन

तळेरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांचे मार्गदर्शन

वाहतूक सुविधा ही आपली मूलभूत गरज -वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव

नागरिकांनी आपली कर्तव्ये जबाबदाऱ्या ओळखून वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे -वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे मध्ये आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल-कणकवली यांच्या वतीने वाहतुकीच्या मार्गांबाबतचा मार्गदर्शन कार्यक्रम प्रशालेत नुकताच पार पडला.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव , सुनिल तळेकर चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशभाऊ तळेकर , वाहतूक सहायक पोलीस राजेश ठाकूर ,अमोल गोसावी ,हेमंत धुरी, कॕलीस डिसुझा ,सुरेश सावंत,अभि तांबे, चंद्रकांत वागतकर,शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर, , माजी सरपंच तथा शाळा समिती सदस्य चंद्रकांत तळेकर ,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सहायक शिक्षिका डी.सी.तळेकर, एन्.बी.तडवी , ए.बी.कानकेकर , पी.एन्. काणेकर ,पी.एम् .पाटील , एन.पी.गावठे, व्ही.डी.टाकळे , एस.एन.जाधव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना अचूक आणि मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले, आपल्या अनेक आवश्यकतांपैकी दळणवळण-वाहतूक सुविधा ही आपली मूलभूत गरज आहे.तिचा लाभ घेत असताना आपली कर्तव्य भुमिका नेमक्या काय असायला पाहिजेत याचा प्रत्येक नागरिकांनी खोलवर विचार केला पाहिजे.वाहनांमध्ये गरजेपेक्षा जास्त लोक बसवणे,हेल्मेट घातल्यासारखे करणे एरवी हातातच घेणे,यांसारख्या सर्वसाधारण दिसणाऱ्या गोष्टींचे अनुसरण टाळा.अनेक अनुभवांचे चिंतनांचे परिपाक असतात नियम. या नियमांचे पालन सर्वांनी केले पाहिजे.धोका हा पत्करायचाच नाही , काळजी घेवून देखील अपघात झाले तर आपण देशाचा नागरिक या नात्याने जबाबदारीने वागले पाहिजे.अपघात झालेल्या भागात तंत्रज्ञानाचा म्हणजेच मोबाईलचा वापर हा सेल्फी काढायला न वापरता पोलिसांना,रुग्णवाहिकांना फोन करण्यासाठी वापरावा याचे भान प्रत्येकास यावे या हेतूने वाहतूक मार्गाचे सर्व नियम,कलम यांचे सखोल मार्गदर्शन अरुण जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी.गावठे तर आभार पी.एम.पाटील यांनी मानले.

वाहतूक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांचे स्वागत करताना प्राचार्य अविनाश मांजरेकर ,चंद्रकांत तळेकर, सुरेशभाऊ तळेकर , प्रविण वरूणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =