अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तळेरे हायस्कूल येथे शुभेच्छा पत्रांचे प्रदर्शन
वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय , तळेरे येथे आज *स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा पत्र ( ग्रिटींग कार्ड ) प्रदर्शनाचे* आयोजन केले होते. शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चेअरमन अरविंद महाडीक, शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर , तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष , राजू जठार , प्राचार्य अविनाश मांजरेकर , शिक्षक- पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष पाटणकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ , जेष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे , ए.बी. कानकेकर , पी. एन काणेकर , डी.सी.तळेकर पी.एम.पाटील , एन.बी. तडवी , व्ही.डी.टाकळे , ए.बी. तांबे , एस.एन. जाधव , एस.यु,सुर्वे , एन.पी.गावठे , ए.पी.कोकरे , समीर चव्हाण , अंकीत घाडीगावकर , लिपीक राजेश तांबे, कल्पेश तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,माजी विद्यार्थी , पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पाचवी ते दहावी वर्गातून पी. एन. काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला होता . विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने विविध प्रकारची आकर्षक ग्रिटींग कार्ड तयार केली होती . सर्व विद्यार्थ्यांचे व हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षक पी.एन. काणेकर तसेच प्राचार्य अविनाश मांजरेकर यांचेही मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले . उपस्थितीतांकडून या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला .