You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तळेरे हायस्कूल मध्ये ग्रिटींगकार्ड प्रदर्शन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तळेरे हायस्कूल मध्ये ग्रिटींगकार्ड प्रदर्शन

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तळेरे हायस्कूल येथे शुभेच्छा पत्रांचे प्रदर्शन

वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय , तळेरे येथे आज *स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा पत्र ( ग्रिटींग कार्ड ) प्रदर्शनाचे* आयोजन केले होते. शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चेअरमन अरविंद महाडीक, शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर , तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष , राजू जठार , प्राचार्य अविनाश मांजरेकर , शिक्षक- पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष पाटणकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ , जेष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे , ए.बी. कानकेकर , पी. एन काणेकर , डी.सी.तळेकर पी.एम.पाटील , एन.बी. तडवी , व्ही.डी.टाकळे , ए.बी. तांबे , एस.एन. जाधव , एस.यु,सुर्वे , एन.पी.गावठे , ए.पी.कोकरे , समीर चव्हाण , अंकीत घाडीगावकर , लिपीक राजेश तांबे, कल्पेश तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,माजी विद्यार्थी , पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पाचवी ते दहावी वर्गातून पी. एन. काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला होता . विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने विविध प्रकारची आकर्षक ग्रिटींग कार्ड तयार केली होती . सर्व विद्यार्थ्यांचे व हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षक पी.एन. काणेकर तसेच प्राचार्य अविनाश मांजरेकर यांचेही मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले . उपस्थितीतांकडून या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला .

प्रतिक्रिया व्यक्त करा