विधान परिषद, विरोधी पक्षनेते, प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग दौरा..

विधान परिषद, विरोधी पक्षनेते, प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग दौरा..

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र विधान परिषद, विरोधी पक्षनेते, प्रविण दरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

     शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह, येथे आगमन व राखीव. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथून नांदगाव कडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 9.00 वाजता नांदगाव येथे आगमन व  नांदगाव, जानवली ता. कणकवली येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी. सकाळी 10.00 वाजता जानवली येथून शासकीय वाहनाने ओरसकडे प्रयाण. सकळी 10.30 वाजता ओरस येथे आगमन व जिल्हाधिकारी / कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे समवेत चर्चा स्थळ- सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरस. सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरस, दुपारी 12.00 वा. शासकीय विश्रामगृह,ओरस येथे राखीव. दुपारी. 1.00 वाजता ओरस येथून शासकीय वाहनाने गोवा राज्याकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा