You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या स्वामीनी तर्पेची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनसाठी निवड

बांदा केंद्रशाळेच्या स्वामीनी तर्पेची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनसाठी निवड

बांदा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने दिल्ली येथील राष्ट्रीय चित्र प्रदर्शनसाठी जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वामीनी तर्पे या विद्यार्थीनीची निवड झाली आहे .
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस जनपथ बिल्डींग केंद्रात १२ते २४आगस्ट दरम्यान भारत के भाग्यविधाता या विषयावर आधारित चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्हयातून बांदा केंद्र शाळेत इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या स्वामिनी लक्षण तर्पे या विद्यार्थ्यांनीला या राष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे.स्वामिनीने‌ तिरंग्यासह चंद्रावर टाकलेले पाऊल हे चित्र विशेष आकर्षण ठरणार आहे .


स्वामिनीची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनसाठी निवड झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर सरपंच अक्रम खान मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, केंद्र प्रमुख संदीप गवस , विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे. स्वामिनीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस.बी.पोलाजी सर, वर्ग शिक्षिका वंदना शितोळे, पदवीधर शिक्षका उर्मिला मोर्ये,सरोज नाईक,रसिका मालवणकर, जागृती धूरी, शुभेच्छा सावंत, शितल‌ गवस,रंगनाथ परब,जे.डी.पाटील, प्रशांत पवार ,गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले. बांद्यातील स्वामिनी तर्पेची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा