सावंतवाडी तालुक्यातील बांदा जवळील डेगवे हे छोटेसे निसर्गरम्य गाव. श्री महालक्ष्मी, श्री स्थापेश्वर भाविकांचे श्रद्धास्थान. डेगवे गावातील ४८ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री स्थापेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार सर्व भक्तगणांच्या सहकार्याने करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला आहे. श्री स्थापेश्वर मंदिराच्या गर्भगुढीचे व आतील परिसराचे सुशोभीकरणाचे काम सर्व भक्तांच्या सहकार्याने अंतिम टप्प्यात पोचलेले आहे.
डेगवे येथील जिर्णोद्धार समिती तसेच ग्रामस्थ हितवर्धक संघ आपल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकारी मंडळ डेगवे यांची सर्व ४८ खेडी, ग्रामस्थ बांधव, हितचिंतक, आप्तेष्ठ, व इच्छुक दाते यांच्याकडून मंदिराचे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती देणगी मिळावी अशी अपेक्षा आहे. श्री.महालक्ष्मी, श्री.स्थापेश्वर यांच्या कृपेने सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतातच, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून मदत करावी अशी विनंती कार्यकारी मंडळ आणि डेगवे ग्रामस्थ हितचिंतक मंडळातर्फे करण्यात येत आहे.
श्री.स्थापेश्वर मंदिरासाठी देण्यात येणाऱ्या देणगीला आयकरात सूट आहे. त्यामुळे सर्वांनी देणगी देऊन दातृत्वाचा आदर्श घालावा अशी कळकळीची नम्र विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे.
सदर देणगीची रक्कम खाली दिलेल्या खात्यात टाकावी व फोटो मंदिर कमिटीस सादर करावा. देणगीची पावती बनविण्यात येईल.
श्री देवी महालक्ष्मी, स्थापेश्वर मंदिर जिर्णोद्धार समिती, डेगवे.
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बांदा
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
खाते क्र. 20161444727
आयएफसी क्र. ifscodemahb0000068
आपले सर्वांचे इच्छित मनोरथ पूर्ण व्हावे ही श्री.महालक्ष्मी, स्थापेश्वर चरणी प्रार्थना…
कार्यकारी मंडळ.
डेगवे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ.
संपर्क :- 9869720936