You are currently viewing भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा – मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांची मागणी

भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा – मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांची मागणी

सावंतवाडी

ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे भूमि अभिलेख संदर्भातील प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी मागणी मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी येथील भूमी अभिलेख चे उप अधिक्षक विनायक ठाकरे यांच्याकडे केली.

येथील भूमी अभिलेख पदी नव्याने श्री ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज मनसेच्या पदाधिकाऱ्याने त्यांची भेट घेऊन स्वागत केले यावेळी झालेल्या चर्चेत विविध प्रश्नावर पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले येथील कार्यालयात सीसीटीव्ही जमीन मोजणी विषयी असलेल्या समस्या ग्रामीण भागातून नकाशा तसेच इतर कागदपत्रासाठी येणाऱ्या लोकांना मारावे लागणारे फेऱ्या व अपूर्ण कर्मचाऱ्यांबाबत चर्चा केली लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व यामध्ये सुधारणा आणण्यासाठी आपल्या स्तरावरून पाठपुरावा व्हावा अशी मागणी केली. तर जिल्ह्यात असलेल्या रिक्त पदांसाठी मनसेच्या माध्यमातून पाठपुरावा करू असं उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, मनविसे शहराध्यक्ष निलेश देसाई, सुरेंद्र कोठावळे ,शुभम सावंत, रोशन सावंत, प्रसन्न सावंत ,कार्तिक माळकर ,विशाल गुरव ,सिद्धू मुलीमानि आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 17 =