You are currently viewing सव्वाशे वर्षाची “अभिषेकची” परंपरा जोपासणारे डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ..!

सव्वाशे वर्षाची “अभिषेकची” परंपरा जोपासणारे डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ..!

बांदा

डेगवे,आंबेखणवाडीतील श्री ब्राह्मणी स्थळी “श्रावण महिन्यातील ५ सोमवार व भाद्रपदातील २ सोमवार मिळून एकूण सोमवारचे व्रत ग्रामस्थ बांधव , स्त्रिया,मुले उपवास करतात. ;प्रतिदिन ग्रामस्थ रात्रीचे भजन करतात. व नंतर ७ व्या सोमवारी न चुकता ग्रामदेवतेच्या अर्थात श्री माऊली चरणीं,४८ खेड्याचा श्री स्थापेश्वर चरणीं तसेच आंबेखणवाडीतील ब्राह्मणीस्थळातील सार्वजनिक तुळशीवृंदावन चरणीं अभिषेक ( एकादशी) करतात.व ते सर्व तिर्थ एकत्र करतात व नंतर ते घेतात.नंतरच दुसऱ्या दिवसापासून मासांहार करण्यास या वाडीतील ग्रामस्थ बांधव प्रारंभ करतात.हि परंपरा गेल्या शंभर,सव्वाशे वर्षे पुर्वजापासून चालला आहे.
यंदा हा अभिषेक सोमवार दि.२०सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी श्री माऊली चरणीं आहे.त्यानंतर श्री महालक्ष्मी,स्थापेश्वर चरणीं आहे.तसेच श्री ब्राह्मणीस्थळात तुळशीच्या चरणीं संपन्न झाला आहे. या कार्यक्रमास डेगवे,आंबेखणवाडीतील ग्रामस्थ बांधव,भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला .नंतर श्री ब्राह्मणीस्थळात भजन केले. शिवाय श्री वासुदेव सखाराम देसाई यांना आँनलाईन भजन गायन स्पर्धेत “उत्कृष्ट भजन गायक “म्हणून बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री उल्हास देसाई,शामसुंदर देसाई, वामन देसाई,गोपाळ देसाई,दिपक देसाई,विनय देसाई, मंगलदास देसाई,योगेश मांजरेकर व भजन मंडळी उपस्थित होते.
श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र देवस्थान समितीचे पदाधिकारी,,ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.

उल्हास देसाई,
सरचिटणीस,

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =