You are currently viewing वाय.बी.आय.एस. किड्सचा सावंतवाडी शहरात शुभारंभ…

वाय.बी.आय.एस. किड्सचा सावंतवाडी शहरात शुभारंभ…

सीबीएससी पॅटर्ननुसार मिळणार दर्जेदार प्री-प्रायमरी शिक्षण

सावंतवाडी

सावंतवाडी शहर व नजीकच्या भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नचे प्री-प्रायमरी शिक्षण घेता यावे याकरिता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल संलग्न वायबीआयएस किड्स या प्री-प्रायमरी स्कूलचा भव्य शुभारंभ आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.
श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, रजिस्ट्रार प्रसाद महाले, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या उपप्राचार्य श्रीमती रोडे, वायबीआयएस किड्सच्या मुख्याध्यापिका उमा झारापकर आदी उपस्थित होते.
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल हे सीबीएसई शिक्षण देणारी शाळा चराठे येथे कार्यरत आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण इथे देण्यात येते. त्या अनुषंगाने सावंतवाडी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्ननुसार पूर्व प्राथमिक शिक्षणदेखील मिळावे अशी मागणी पालक वर्गातून करण्यात येत होती. तिची पूर्तता करण्यासाठीच सावंतवाडी शहरात वायबीआयएस किड्स ची सुरुवात करत असल्याचे अच्युत सावंतभोसले यांनी सांगितले. या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, जूनियर केजी सिनियर व सिनियर केजी पर्यंतचे शिक्षण देण्यात येईल.
शाळेची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने शिकविण्यात येईल. शाळेचा कॅम्पस हा स्वच्छ व सुरक्षित असून विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांना सायंटिफिक ब्रेन गेम्स शिकवण्यात येतील. सीबीएसई अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देतो. त्यानुसारच वायबीआयएस किड्सचीही वाटचाल असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या कोव्हीड साथीच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून इच्छुकांनी 95527 85696 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 1 =