You are currently viewing कट्टा पंचक्रोशीत “गणितोत्सव २०२३” सोहळा उत्साहात संपन्न

कट्टा पंचक्रोशीत “गणितोत्सव २०२३” सोहळा उत्साहात संपन्न

श्रीनिवास रामानुजन जन्मदिवसानिमित्त वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात कट्टा येथे गणित सप्ताहाचे आयोजन

 

कट्टा, २७ डिसेंबर २०२३:

Mathematics for Everyone! या सदराखाली
श्रीनिवास रामानुजन जन्म दिनानिमित्त वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात गणित विभागामार्फत गणितोत्सव २०२३चे आयोजन केले होते. या गणित सोहळ्याचे आयोजन १८ डिसेंबरपासून २६ डिसेंबर २०२३ पर्यंत संपन्न झाले.

**गणितोत्सवची विशेषता:**
1 *सोमवार (१८ डिसेंबर):* Maths Table Day
2. *मंगळवार (19 डिसेंबर):* Number Patterns Day
3. *बुधवार (20 डिसेंबर):* Prime Numbers Day
4. *गुरुवार (21 डिसेंबर):* Perfect Squares Day
5. *शुक्रवार (22 डिसेंबर):* Ramanujan Puzzles Day
6. *शनिवार (23 डिसेंबर):* Pythagorean Triplet Day
7. *मंगळवार (26 डिसेंबर):* Practical Math in Daily Life Day

या सप्ताहाच्या शेवटी सांगता समारंभ दिवशी विशेष आकर्षण म्हणून श्री आदेश बर्डे मु.पो.तेंडोली कुडाळ यांनी मांडलेले प्राचीन काळापासून ते आतापर्यंत चलनात आलेल्या नाणी, नोटा, आणि टपाल तिकीट यांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

या प्रदर्शनात देशातील शालिवाहन काळ ते पोर्तुगीज काळातील, त्याचबरोबर सन १८३५ ते २०२३ पर्यंतची नाणी, नोटा, परदेशी नाणी, नोटा व टपाल तिकीट यांचे भव्यदिव्य असे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचा लाभ अनेक विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिकांनी घेतला.

या गणितोत्सव २०२३ चा *गणित सप्ताह* आयोजन गणित विभाग प्रमुख श्री प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. विद्यार्थ्यांना मुलभुत संकल्पनाचे दृढीकरण व्हावे व विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी होऊन आवड निर्माण व्हावी यासाठी याचे आयोजन करण्यात आले.

या सप्ताहात गणितीय संकल्पना चा वापर *The Game of Maths ladder master* यासारख्या मनोरंजनात्मक खेळाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

विशेष उल्लेखनीय अशी बाब म्हणजे इयत्ता ५वी विद्यार्थ्यांनी 100 पर्यंत पाढे पाठ करून त्याचे सादरीकरण करण्यात आले.
*पिझ्झा* या संकल्पनेतून अपुर्णांकांची सर्व प्रकारची उदाहरणे समजावून दिली.
विद्यार्थी स्वयंप्रेरणेने खेळ खेळत गणिताची संकल्पना समजून घेत असत.
या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी विशेष सहकार्य व प्रोत्साहन दिले.
या सप्ताहासाठी दरदिवशी विविध मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्री शेखर पेणकर, उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर, सचिव श्री सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती चेअरमन श्री सुधीर वराडकर, यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्था सल्लागार श्री दिपक पेणकर, माजी मुख्याध्यापक श्री पाटील सर हे उपस्थित होते.

नाणी नोटा प्रदर्शन उद्घाटन डॉ.श्री सोमनाथ परब, व रामानुजन जयंती दिवशी जिल्हा गणित अध्यापक मंडळ माजीअध्यक्ष श्री वामनराव खोत. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रेरणास्रोत म्हणून मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी गणित शिक्षकांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमासाठी गणित विभाग प्रमुख श्री प्रकाश कानुरकर यांच्या संकल्पनेतुन व गणित विभागातील सहकारी शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.

अशा मनोरंजनात्मक, बुद्धिवर्धक गणिती खेळ सप्ताहासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल श्री शिवानंद वराडकर विश्वस्त अॅड.एस एस पवार व सर्व पदाधिकारी संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =