You are currently viewing इचलकरंजीत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

इचलकरंजीत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

हनुमान मंदिरात सामुहिक हनुमान चालिसा पठन कार्यक्रमास मोठी उपस्थिती

इचलकरंजी / प्रतिनिधी

राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत या मागणीसाठी
इचलकरंजी येथे मनसे पक्षाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त गांधी पुतळा हनुमान मंदिर येथे सामुहिक हनुमान चालिसा पठन करुन अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती.

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारने ३ मे पर्यंत
मशिदींवरील भोंगे काढावेत अशी मागणी मुंबईतील जाहीर सभेत केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून मनसे पक्षाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त राज्यातील मंदिरांमध्ये सामुहिक हनुमान चालिसा पठन करण्याची घोषणा केली होती .त्यानुसार इचलकरंजी येथे आज शनिवारी
मनसे पक्षाच्या वतीने गांधी पुतळा हनुमान मंदिर येथे सामुहिक हनुमान चालिसा पठन करुन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
तसेच मशिदींवरील भोंगे तात्काळ उतरावेत ,अशी जोरदार मागणी केली.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील यांनी राज्य सरकारने ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत ,अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू , असा इशारा दिला.
यावेळी मनसेचे जिल्हा उपप्रमुख रवी गोंदकर ,सहकार सेना जिल्हाप्रमुख मनोहर जोशी , सिंधुताई शिंदे ,तालुका उपप्रमुख शहाजी भोसले ,विनायक मुसळे , राजेंद्र निकम , महेश शेंडे ,योगेश दाभोळकर , रोहित कोटकर ,उत्तम पाटील ,अरुण घोलपे , मारुती जावळे ,यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा