You are currently viewing ती घटना दुर्दैवी…

ती घटना दुर्दैवी…

 

*घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी लागलीच पोलीस ठाण्यात एकत्र येऊन “लॉबिंग” करतात हे देखील तितकेच निषेधार्ह..!*

आपत्ती निवारण कार्यकाळ चालू असताना मुख्याधिकारी आपले हेडक्वार्टर सोडून कुडाळला कोणाच्या परवानगीने आले…मनसेने उपस्थित केला सवाल..?

सिंधुदूर्ग :

अलीकडेच कुडाळ नगरपंचायत मध्ये नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक खडाजंगी होऊन प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेल्याची घटना घडली.तद्नंतर मुख्याधिकाऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे सरकारी कामात अडथळा केल्याचे सांगून “त्या” नगरसेवकाविरुद्ध गुन्हा नोंद केला.ह्यात नगरसेवकावर कारवाई झाली मात्र नगरसेवकाकडून अशा प्रकारची कृती का घडली याचीही कारणं शोधून त्याबाबत उच्चतरीय चौकशी होणे गरजेचे आहे.शिवाय सदरच्या घटनेदरम्यान जिल्ह्यात आपत्ती निवारण कायदा लागू असताना नगरपालिकांचे मुख्याधिकारी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात कारवाईसाठी दबावतंत्राचा वापर करतात याकडे प्रामुख्याने लक्ष वेधणे गरजेचे आहे.अशाप्रकारे मुख्याधिकाऱ्यांनी आपले हेडक्वार्टर सोडताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती का..? अत्यावश्यक कारण नसताना देखील संबंधित सर्व मुख्याधिकारी कुडाळ पोलीस ठाण्यात एकत्र नेमके कशाच्या आधारावर जमू शकतात..? मुख्याधिकाऱ्यांची अशी कृती म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी पोलीस दंडसाहिता 1973 मधील तरतुदींचा भंग नाही का..? ह्याकडेही जिल्हा प्रशासनाने तेवढ्याच गंभीरपणे लक्ष वेधून कारवाई करणे गरजेचे आहे. यायाधी दोडामार्ग येथे सुद्धा एका प्रकरणात अशाच प्रकारे जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांनी एकत्र जमत पोलिसांवर दबाव आणून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून घेतल्याची घटना आहे. मुख्याधिकऱ्यांच्या अशा कार्यपध्दतीबाबत “मनसे” वरिष्ठ पातळीवर रीतसर तक्रार दाखल करणार असून मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + six =