एकनाथ खडसेंचा राजीनामा अन् पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर….

एकनाथ खडसेंचा राजीनामा अन् पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर….

वृत्तसंस्था

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमधील नाराज असलेल्या नेत्यांना इतर पक्षांकडून ऑफर देण्यास सुरुवात झाली आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी शिवसेनेची दारे खुले आहेत, असे म्हणत शिवसेनेत येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला खूप छळ केला असा आरोप करत भाजपला एकनाथ खडसे यांनी बुधवारी रामराम केला.

त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारचा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे याही विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांच्या प्रमाणे दूर आहेत.

तसेच त्यांच्यावर पक्षाकडून अन्याय होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. अशा वेळी शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांच्यासह शिवसेनेचे दार खुले असे म्हणत शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून पंकजा मुंडे या ऑफरला काय उत्तर देता हे पाहणे महत्त्वाचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा