You are currently viewing बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२८ दात्यांनी केले रक्तदान: बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शुभारंभ..

बांदा

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २८ दात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उदघाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, गोवा बांबोळी ब्लड बँकेचे डॉ. संजय कोरगावकर, भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, प्रशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शांताराम असनकर, विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, रोटरॅक्टचे अध्यक्ष अक्षय मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान चळवळ वाढावी, याचे महत्व युवा पिढीला समजावे यासाठी शाळेच्या मुलांसाठी अभिनव उपक्रम घेण्यात आला. मुलांनी शाळेच्या भिंतीवर रक्तदान श्रेष्ठदान ही संकल्पना घेऊन अनेक चित्रे रंगविली. या मुलांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी २८ दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी संकेत वेंगुर्लेकर, अक्षय कोकाटे, दत्तराज चिंदरकर, अवधूत चिंदरकर, रोहन कुबडे, विनिता कुबडे, मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे डी. पाटील यांनी केले. आभार संकेत वेंगुर्लेकर यांनी मानले.

WhatsApp

प्रतिक्रिया व्यक्त करा