You are currently viewing हर घर तिरंगा नव्हे… हर घर चौरंगा. 

हर घर तिरंगा नव्हे… हर घर चौरंगा. 

मालवण

 

राष्ट्रध्वज चार रंगांचा आहे. तिरंगा म्हणून राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये. ग्रामपंचायत, नगरपालिका पोस्ट ऑफिस मधून स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवी राष्ट्रध्वज पुरवून चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र सदरील राष्ट्रध्वज हे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे आहेत. सदरील राष्ट्रध्वज २:३ प्रमाणात नाहीत. अशोकचक्र ध्वजाच्या मधोमध नाही. सदर झेंडे फडकवून राष्ट्रध्वजाचा अवमान करु नये. राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी जवळच्या शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी उपस्थित रहा. ध्वजाचा अवमान करणार्या प्रिंटींग कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. शाळा कॉलेज मध्ये राजकीय पदाधिकारी न बोलवता शाळेमध्ये शेवटच्या वर्षांत पहिला आलेल्या विद्यार्थांच्या हस्ते ध्वजारोहण करा, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा अध्यक्ष रोहन कदम यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा