You are currently viewing भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते परबवाडा येथील नवनिर्वाचित सरपंच सदस्य व माजी सदस्य यांचा सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते परबवाडा येथील नवनिर्वाचित सरपंच सदस्य व माजी सदस्य यांचा सत्कार

*भाजपचे सरपंचा सहीत सातही ग्रामपंचायत सदस्य बहुमताने निवडून येत शिवसेनेचा सुपडा साफ केला..*

वेंगुर्ले :

 

परबवाडा ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरपंच व सर्व सदस्य निवडून आल्याने भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सर्व उमेदवारांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परबवाडा येथे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरपंच पपु परब यांनी गेली पाच वर्षे सरपंच पदाची यशस्वी कारकीर्द करून पुन्हा एकदा निवडुन आल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच उपसरपंच हेमंत गावडे व संतोष गावडे हे सुद्धा पुन्हा एकदा विजयी झाल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. शमिका बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, सुहीता हळदणकर, स्वरा देसाई या विजयी उमेदवारांचा सन्मान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना उर्ऊ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, बुथ अध्यक्ष संजय मळगावकर, माजी सरपंच इनासिन फर्नांडीस, उभादांडा माजी सरपंच देवेंद्र डीचोलकर, माजी ग्रा. सदस्य अर्चना परब, अनिल गवंडे, अजित गवंडे, सुनील परब, कांता देसाई, उदय सावंत, सचिन सावंत, अक्षय परब, सुवर्णा सावंत, सरिता परब, गायचोर मॅडम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 7 =