You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मत्स्य सोसायटी यांना डिझेलचा परतावा दिल्याबद्दल मा. सुधीर मुनगंटीवार मत्स्य मंत्री महाराष्ट्र यांना धन्यवाद….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मत्स्य सोसायटी यांना डिझेलचा परतावा दिल्याबद्दल मा. सुधीर मुनगंटीवार मत्स्य मंत्री महाराष्ट्र यांना धन्यवाद….

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मत्स्य सोसायटी यांना डिझेलचा परतावा दिल्याबद्दल मा. सुधीर मुनगंटीवार मत्स्य मंत्री महाराष्ट्र यांना धन्यवाद….*

भाजपा शिंदे गटाचे युती सरकार महाराष्ट्रात आल्यावर मा. रवींद्र चव्हाण पालकमंत्री यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती. यावेळी आमदार मा. नितेश राणे व मा. निलेश राणे युवा नेते यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्येबाबत पाढा वाचला होता .केंद्रातील मत्स्य संपदा योजना सक्षमपणे जिल्ह्यात न राबविणे, त्यात राजकीय हस्तक्षेप करणे ,डिझेल परतावा न मिळणे ,सागर मित्र यांची नेमणूक न करणे, वादळातील मिळालेली नुकसान भरपाईत पक्षपात करणे असे प्रकार पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले होते .या अनुसरून पालकमंत्री यांनी मंत्रालयामध्ये मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक आयोजित केली होती .त्यावेळी डिझेल परतावा वेळेवर न मिळाल्यास सोसायटीचे व मच्छीमारांचे होणारे नुकसान या संदर्भात निलेश राणे यांनी स्पष्टता केली होती . निपक्षपणे हाजी हाजीव भीक मागण्यासारखे परतावा न देता भरघोस परतावा व संपूर्ण परतावा द्यावा अशी मागणी केली होती .त्या अनुसरून सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ डिझेल परतावा दिला .त्याचबरोबर केंद्रातील मत्स्य संपदा योजना जिल्ह्यात सक्षमपणे राबवण्यासाठी सागर मित्र नेमणूक करणे आवश्यक आहे अशी मागणी केली होती त्या अनुसरून जिल्ह्यामध्ये दहा सागरमित्रांची नेमणूक. कायमस्वरूपी सहाय्यक आयुक्त ची पण नेमणूक तात्काळ करण्यात आली आहे .तसेच समुद्र गस्तीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून कार्यान्वित करण्यात आली आहे . भाजपा शिदे सरकार मुळे प्रशासन कसे गतिमान झाले आहे याचीही प्रचिती जनतेला येत आहे. मच्छीमारांच्या प्रश्नाकडे युती सरकार गांभीर्याने पाहत आहे.
आघाडी सरकार वेळी हक्काचे पैसे भीक मागल्यासारखा निधी मागावा लागत होता आणि सरकार उपकार करते अशा हमीभावात पक्षपात करून निधी देत होता. याचीच प्रसिद्धी घेण्याचे काम स्थानिक आमदार करत होते .
मत्स्य संपदा योजनेतील व चांदा ते बांदा ,सिंधू रत्न योजनेतील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर कार्यवाहीत होण्यासाठी मा .निलेश राणे यांच्यामार्फत भाजपा कार्यरत असून मच्छीमार व मच्छीमार सोसायटीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे .तसेच माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत मा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहे .
डिझेल परताव्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल व सागर मित्र याची नेमणूक केल्याबद्दल माननीय सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मा. निलेश राणे यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
माजी नगराध्यक्ष – अशोक तोडकर, बुथप्रमुख – नारायण धुरी, वसंत गावकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 5 =