You are currently viewing सिंधुदुर्गात शिरोडा येथून काँग्रेस तर्फे आजादी गौरव पदयात्रेस प्रारंभ

सिंधुदुर्गात शिरोडा येथून काँग्रेस तर्फे आजादी गौरव पदयात्रेस प्रारंभ

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त अखिल भारतीय काँग्रेसने संपूर्ण देशात आजादी गौरव पदयात्रा क्रांतीदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक तालुक्यात काढण्याचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पदयात्रेची सुरवात महात्मा गांधीनी केलेला मिठाचा ऐतिहासिक सत्याग्रह वेंगुर्ल्यातील ज्या शिरोडा या गावी झाला होता त्या ठिकाणी या पदयात्रेची सुरवात करण्यात आली. देशभक्तीच्या जोशपूर्ण वातावरणात या पदयात्रेची सुरवात झाली. रिक्षा मधून लावलेल्या देशभक्तीपर गीतानी वातारण उल्हसित झाले होते त्यातच दिल्या जाणा-या घोषणा ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ याने परीसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या पदयात्रेत युवकांबरोबर महिला सुद्धा मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.

या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख,कार्याध्यक्ष विलास गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, उपाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर,उपाध्यक्ष नागेश मोर्ये, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, मिडिया कोकण समन्वयक केतनकुमार गावडे,ओबीसी विभाग प्रदेश सचिव अमिदी मेस्त्री, महिला प्रदेश पदाधिकारी विभावरी सुकी,माजी वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, वेगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, अरविंद मोंडकर, अजिंक्य गावडे,सुंदरवल्ली पडयाची,गोविंद कुंभार, चंद्रकांत राणे,सुधीर मल्हार,जेम्स फर्नांडिस, वेंगुर्ला शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर,स्मीता वागळे,जस्मीन लक्शमेश्वर,समाधान बांदवलकर, अण्णा गावडे,आबा मयेकर,गौरेश राऊत,सारीका वेंगुर्लेकर,संकेत वेंगुर्लेकर, विशाल वेंगुर्लेकर, धीरज घाडी,कलीम खान,साईराज परब,दिपक मोबारकर,मिठ्ठू मकानदार, दिपक चोपडेकर, सुदर्शन कुंभार, सत्यवान कुंभार, आबा मसूरकर,संजय आचरेकर,महेश कुंभार,कौशल नाईक,ओंकार कदम,अक्षय कुंभार,आनंद मसूरकर, अभिजीत राणे,मयुर कुंभार, उत्तम चव्हाण, श्रवणी परब,यश परब,ओमसाई कुंभार,आयुष परब,विशाल गावडे,सर्वांगी राऊत,सुमीत राऊत,अमोल राऊळ, आत्माराम घाडी, स्वप्नाली राऊत, नंदिनी आचरेकर,मोहन नंदगडकर, किशोर राऊत,संतोष कांबळी,सुमीत कुबल,भाऊ गावडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा